*”जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच”…”आम्ही बालकवी” समूह सदस्या लेखिका कवयित्री आदिती मसुरकर यांची अप्रतिम बालगीत रचना*
*परी राणी*
*काव्यप्रकार -बालगीत*
स्वप्नात आली माझ्या एक परीराणी,
गात होती ती छान छान गाणी.. ॥ धृ ॥
हातात होती तिच्या जादूची छडी,
तिला पाहताच मी मारली दडी….
कानावर आली तिची गोड वाणी
गात होती ती छान छान गाणी ॥ १ ॥
मला म्हणाली तू घाबरू नकोस मुला,
जादूची नगरी मी दाखवीन तुला..
फिरवीन तुला मी हिरव्यारानी
गात होती ती छान छान गाणी ॥ २ ॥
जादूचे पंख तिने लावले मला
अद्भूत विश्व पाहू चला ..
रम्य जग पाहून डोळा आले पाणी
गात होती ती छान छान गाणी ॥ ३ ॥
ताऱ्यांच्या पंगतीत मी पोटभर जेवलो,
चांदोबाच्या गंमती ऐकुनी खूप हसलो..
बागडत होती तिथे चंदाराणी
गात होती ती छान छान गाणी ॥ ४ ॥
परीच्या घरी होती खेळणी खूप सारी,
त्यांच्यासंगे खेळण्या मजा आली भारी.
परीची बाहुली होती नाव तिचे बानी
गात होती ती छान छान गाणी ॥ ५ ॥
तेवढ्यात कानी आली आईची हाक ,
झोपेतून जाग येताच स्वप्न झाले खाक.
अशी होती परीची सुंदर कहाणी
गात होती ती छान छान गाणी ॥ ६ ॥
*✒️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ, सिंधुदुर्ग*