You are currently viewing हॉटेल,बार, उपाहार गृहे सुरु करण्या संदर्भात (SOP) नियमावली जाहीर

हॉटेल,बार, उपाहार गृहे सुरु करण्या संदर्भात (SOP) नियमावली जाहीर

मुंबई

वृत्तसार:

मिशन बिगीन अगेनअंतर्गत येत्या ५
ऑक्टोबरपासून जास्तीत जास्त ५० टक्के इतक्या क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे.
राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचलला आहे.गेल्या काही अनेक दिवसां पासून हॉटेल, उपहारगृह आणि बार सुरू करण्याची मुभा दिली आहे.

सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करणे आवश्यक आहे.
लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे बंधन कारक असणार आहे.
ग्राहकांना मास्क वापरण्याचे बंधन तर आहेच, खानपानाशिवाय इतर वेळी मास्क वापरण्याचे बंधन असणार आहे.
आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी
हॉटेल मालकाने ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करावे तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन द्यावे,
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आदी माहिती घ्या
रोख व्यवहारात चलन काळजीपूर्वक हाताळावे रेस्टरुम, वॉशरुम, हात धुण्याची जागा, खानपानाची जागा यांची सतत स्वच्छता करावी
हॉटेल कर्मचाऱ्यांचे वास्तव्य असलेली जागा तसेच स्वयंपाकाची जागा येथे स्वच्छता बाळगावी
तसेच काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे
हॉटेलमध्ये गर्दी टाळवी आणि ग्राहकांना फोनवरुन टेबल आरक्षित करण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा
शक्य असल्यास प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात यावे.
टेबल, खुर्च्या, कॅश काऊंटर वारंवार निर्जंतुकिकरण; सेवा देण्याच्या वस्तू सतत निर्जंतुक तसेच दोन टेबलांमध्ये किमान १ मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असणार आहे.
खिडक्या खुल्या ठेवा, एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे.
क्युआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहीत मेनुकार्ड द्या.
बुफे सेवेला परवानगी नसेल; भांडी आणि अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वॉर्मर्स वापरा
ग्राहकांनी वापरलेली भांडी लगेच धुण्यासाठी न्या तसेच सर्व भांडी गरम पाण्यात धुवा, संमत जंतुनाशकाने धुवा.
सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमीत कोव्हीड चाचणी करणे अत्यावश्यक आसणार आहे.
आवारात करमणुकीचे कार्यक्रम आणि सर्व खेळांना बंदी असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा