You are currently viewing मोपा विमानतळाचा सिंधुदुर्गलाही निश्चित फायदा होईल – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मोपा विमानतळाचा सिंधुदुर्गलाही निश्चित फायदा होईल – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मालवण :

आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाचे काम पूर्णत्वास जात असून येत्या १५ ऑगस्टला उद्घाटन होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे विमानतळ केवळ प्रवासी वाहतुकी पुरतेच मर्यादित नसून या विमानतळावरुन आयात निर्यातही होणार आहे. हे विमानतळ सिंधुदुर्गच्या जवळ असून या विमानतळाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही होणार असल्याची माहिती गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

मोपा विमानतळाचा सिंधुदुर्गलाही निश्चित फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेला सदिच्छा भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवित असलेल्या सर्वसामान्यांसाठी च्या योजनासाठीचालाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले सबका साथ सबका विकास आत्मनिर्भर भारत यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे ते म्हणाले जिल्ह्यातील काजू उद्योगासाठी गोवा सरकार प्रयत्न करेल का असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले गोव्याला बाजारपेठ म्हणून सिंधुदुर्ग ने बघावे एवढे उत्पन्न त्यांनी घेतले पाहिजे साऊथ आफ्रिकेकडून काजू आणावा लागू नये जिल्हा वासियांनी प्रोसेसिंग वर लक्ष केंद्रित करावे या यासाठी गोवा मार्केट उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी परिसरातील महामार्गाचे काम रखडले आहेत मात्र हे काम पावसाळ्या अगोदर केले जाईल संबंधित कंत्राटदाराला तशा सूचना दिल्या जातील असे ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर करीत आहेत केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे.

सरकार कुठलेही असो केंद्र सरकारच्या योजना राज्यात पोहोचणे महत्त्वाचे आहे राज्यात सरकार या योजना किती पुत्र होते हे माहीत नाही मात्र जिल्हा बँक पोचवते याचे कौतुक असल्याचे त्यांनी सांगितले गोवा स्वातंत्र्य मुक्ती लढ्यात
जिल्ह्यातील ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांना अद्यापही लाभ मिळत नाही याकडे लक्ष वेधले असता अशा स्वतंत्र सेनानी गोवा सरकारची संपर्क साधावा निश्चितच सर्व पडताळणी करून त्यांना न्याय दिला जाईल असे त्यांनी सांगितले औरंगजेबाच्या कबरी समोर ओवेसी नतमस्तक झाला, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद मध्ये सहभाग घेत आहे याबाबत विचारले असता त्यांनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले.

प्रतिक्रिया व्यक्त करा