कणकवली
ग्रामपंचायत निवडणुकींच्या प्रारूप प्रभाग रचने करिता यापूर्वी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र आता त्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून, ज्या सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत त्यांच्यावर सुनावणी घेण्यात आली आहे त्यांची पुन्हा सुनावणी होणार नसल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. तसेच ज्या सूचना व हरकतीवर सुनावण्या ची तारीख लावण्यात आली होती, मात्र त्यावर सुनावणी झाली नव्हती अशा सूचना व हरकती नवर 13 मे रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना मार्फत सुनावणी घेण्यात येणार होती. परंतु कणकवली तालुक्यातील प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकतींवर यापूर्वीच सुनावणी पूर्ण झालेली असल्याने आता तर 19 मे रोजी या हरकती व सूचना सूचनांवर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. 24 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रारूप प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. तर 27 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या प्रभाग रचनेला प्रसिद्धी देण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पहिल्यापासून हरकती घेणे ही प्रक्रिया वाचणार आहे अशी माहिती प्रभारी तहसीलदार शिवाजी राठोड यांनी दिली. यापूर्वी दोन वेळा जाहीर केलेल्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम ओबीसी आरक्षणाच्या स्थगिती संदर्भातील न्यायालयाच्या आदेशानंतर रद्द करण्यात आला होता. एकदा तर प्रभाग रचनेवर संदर्भात घेतलेल्या हरकतींवर सुनावणी देखील घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयाकडून निर्णय आल्यानंतर हा संपूर्ण राबविलेला कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.