*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गीतकार संगीतकार गायक श्री.अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*
*”श्रीकृष्ण लिला”*
कृष्ण भक्तांसाठी दावी लीला अगम्य अगाध
कृष्ण नाम असे अखंड अर्जुनाच्या मुखांत।।ध्रु।।
महाभारत युद्ध संपून आले कृष्ण अर्जुन
रुक्मिणीने केले दोघांचे स्वागत द्वारकेत
तिने बनवले प्रेमाने सर्वांसाठी भोजन।।1।।
अर्जुन थकले होते खूप झाले निद्रिस्त
कृष्ण नाम येत होते त्यांचे रोमरोमांतून
रुक्मिणी गेली बोलावण्यास घेण्या प्रसाद।।2।।
दृश्य पाहून विसरली करी टाळ्यांची साथ
नारद गेले उठवाया झाले विणेसह तल्लीन
सत्यभामा गेली बोलवाया करी नर्तन।।3।।
शेवटी उठले बोलावण्यास अर्जुनास कृष्ण
रुक्मिणी नारद सत्यभामा दंग कीर्तनात
देव साश्रूनयने अर्जुनाचे पाय चेपत।।4।।
अश्रुंच पडता पायावर अर्जुन अचंबित
म्हणाले प्रभू आपण काय करीत आहात
कृष्णाने अर्जुनाला दिले प्रेमाने आलिंगन।।5।।
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.