You are currently viewing हत्तींकडून झालेल्या नुकसानीबाबत केर-भेकुर्ली ग्रामस्थांचे १५ मे रोजी जागर आंदोलन…

हत्तींकडून झालेल्या नुकसानीबाबत केर-भेकुर्ली ग्रामस्थांचे १५ मे रोजी जागर आंदोलन…

दोडामार्ग

केर-भेकुर्ली गावात हत्तींकडून झालेल्या नुकसानीबाबत वन विभाग व लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी १५ मे रोजी जागर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत आज येथील सामाजिक कार्यकर्ते प्रेमानंद देसाई यांच्या उपस्थितीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, केर-भेकुर्ली गावात गेली पाच वर्षे हत्तींकडून शेती बागायतींचे नुकसान होत आहे. यासंदर्भात २०२० साली पालकमंत्री खासदार व वन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली होती. त्यात झालेल्या निर्णयांची अद्याप पूर्तता झालेली नाही. तर यावर्षीही हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र वनविभागाने नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही, त्यामुळे संबंधित प्रशासनाला जागण्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी “जागर आंदोलन” करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ मे रोजी सायंकाळी ६:०० हे आंदोलन करण्यात येणार आहे. असा इशारा देण्यात आला.

या निवेदनावर नारायण देसाई, साबा देसाई, गोपाळ देसाई, सगुण नाईक, रत्नाकांत देसाई, संजय देसाई, आनंद राऊत, मुकुंद नाईक, दाजी देसाई आदींच्या स्वाक्षरी आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा