तालुकाध्यक्ष सांगेलकर यांच्या वाढदिनी केला प्रवेश; सांगेली जायपीवाडी येथे सावंत यांच्या प्रवेशाने काँग्रेसला मिळाले बळ
सावंतवाडी
सांगेली जायपीवाडी येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते संतोष सावंत यांनी आपल्या सर्व समर्थकांसह सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काॅगेस मध्ये जाहीर प्रवेश केला. काँग्रेस चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी ॲड.गुरुनाथ आईर, कलंबिस्त पंचक्रोशीतील युवा नेतृत्व विजय कदम, सावंतवाडी तालुका काँग्रेस सरचिटणीस रूपेश आईर, संजय राऊळ, उपाध्यक्ष अशोक राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. सांगेली-माडखोल जिल्हा परिषद मतदार संघाच्या मोर्चे बांधणीला काँग्रेस ने जोरदारपणे सुरू केली आहे. हा मतदार संघ लढवून काँग्रेसचा झेंडा फडकवायचा असा निर्धार काँग्रेसने महेंद्र सांगेलकर यांच्या वाढदिनी केला आहे. महेंद्र सांगोलकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संतोष सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसच्या कार्यकर्त्याने महेंद्र सांगेलकर यांना वाढदिवसाच्या दिवशी एक अनोखी आणि आगळीवेगळी भेट दिली आहे. मला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ने मी माझ्या काँग्रेस कार्यकर्त्यांसह,जनता, मित्र परिवार, हितचिंतक यांना धन्यवाद देत असल्याचे महेंद्र सांगेलकर यांनी सांगितले. संतोष सावंत यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसचे बळ सांगेली- माडखोल पंचक्रोशीत वाढले असून या जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस अजून मजबूत होण्यास मदत होणार आहे. काँग्रेसचा असाच झंजावात पुढे सुरू राहील आणि भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस नंबर वन चा पक्ष बनेल, असा दावा महेंद्र सांगेलकर यांनी केला आहे. या प्रवेशासाठी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्यासह ॲड.गुरुनाथ आईर, कलंबिस्त पंचक्रोशीतील युवा नेतृत्व विजय कदम, सावंतवाडी तालुका काँग्रेस सरचिटणीस रूपेश आईर, संजय राऊळ, उपाध्यक्ष अशोक राऊळ यानी विशेष प्रयत्न केले.