इचलकरंजी/प्रतिनिधी
सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोल्डविंग्स फौंडेशनच्या संस्थापिका सौ. मौश्मी राहुल आवाडे यांना ‘आयडल्स ऑफ महाराष्ट्र वूमन इन्फ्लुयन्सर्स’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल सौ. मौश्मी आवाडे यांचा अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गोल्डविंग्स फौंडेशनच्या संस्थापिका सौ. मौश्मी आवाडे यांनी
सामाजिक क्षेत्रासह आयपीएमसीच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातही स्वतःचे अस्तित्व सिध्द केले आहे. तर राजकीय क्षेत्रात युवा संघटनेच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महापूर, कोरोना काळातही त्यांनी उत्कृष्ठ नियोजनातून नागरिकांना आधार देण्याचे कार्य केले. महिला महोत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, उपक्रम व स्पर्धांद्वारे महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्या नेहमीच कार्यरत असतात. याच कार्याची दखल घेत त्यांना
आयडल्स ऑफ महाराष्ट्र वूमन इन्फ्लुयन्सर्स’ हा
पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.याबद्दल सौ. मौश्मी आवाडे यांचा अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नजमा शेख ,नरेश हरवंदे, राहुल घाट, सुरज राठी, तात्यासो कुंभोजे, अजिंक्य रेडेकर, प्रशांत कांबळे, सुहास कांबळे, प्रा.
शेखर शहा, बाळासाहेब माने, विनायक बचाटे, गोगा बाणदार, संग्राम सटाले, स्वप्निल पाटील, विजय चव्हाण, सचिन लायकर, शितल पाटील, अमोल जाधव, फहीम फाथरवट, अक्षय केटकाळे, प्रमोद केटकाळे, सुरज शिंदे, अनिकेत शिंदे, सुलेमान मुजावर, अक्षय आळंदे, शशिकांत शेटके, कपिल शेटके, संतोष काळगे, प्रमोद इंगवले, अमित जानवेकर, प्रसाद भोपळे, सुमित जानवेकर, अभिजीत शेटके, अक्षय शेटके, वैभव पोवार, प्रथमेश लाटणे, केतन शिंदे,, सोनाली मुगुळखोड, रोहिणी वरुटे, नंदिनी साळुंखे, एस. एन. पिसाळ, राजू बोहरा, अरविंद शर्मा, भगवान खंडेलवाल, करणसिंह राजपुरोहित, राजू उपाध्याय, राजू पंचारिया, विनोद दायमा, मुकेश खंडेलवाल, मांगीलाल राजपुरोहित, डॉ. अमित खंडेलवाल, ब्रिजेश दायमा आदी उपस्थित होते.