You are currently viewing तुळजाभवानी मंदिर संस्थांनकडून खासदार संभाजीराजे यांचा अवमान…

तुळजाभवानी मंदिर संस्थांनकडून खासदार संभाजीराजे यांचा अवमान…

“त्या” व्यवस्थापना विरोधात कारवाई करा; परिवर्तनवादी व आंबेडकरवादी जनतेची मागणी…

सिंधुदुर्गनगरी

तुळजाभवानी मंदिर संस्थांनकडून छत्रपतींचे वंशज असलेल्या खासदार संभाजीराजे यांचा अवमान केल्याच्या दुर्दैवी घटनेचा निषेध करणारे निवेदन आज जिल्ह्यातील परिवर्तनवादी व आंबेडकरवादी जनतेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. तर संबंधित व्यवस्थापनाच्या विरोधात शासनाने कडक कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा धार्मिक व्यवस्थापक यांनी छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे यांना देवीच्या गर्भ गाभार्‍यात प्रवेश नाकारून त्यांचा अवमान केल्याची घटना घडली आहे. ही बाब अतिशय खेदजनक व दुर्दैवी आहे. या घटनेचा निषेध करणारे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक परिवर्तनवादी व आंबेडकरवादी जनतेच्या वतीने जिल्हाधिकारी याना सादर करण्यात आले. हे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्याकडे सादर करण्यात आले. या घटने बाबत संबंधित व्यवस्तापनाच्या विरुद्ध शासनाने कड़क कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, यांच्यासह प्रकाश चव्हाण, नंदन वेंगुर्लेकर, सुजित जाधव, नामदेव जाधव, पि के चौकेकर, शेषकुमार नाईक, शरद जाधव, मोतीराम चराठकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा