राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले निवेदन
सावंतवाडी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग चे उद्योग व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या समस्या बाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले असून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या आहेत.
यावेळी या समस्यांचे शासनामार्फत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन उपाययोजना करू असे आश्वासन देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या उद्योग व व्यापार विभागाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य कार्यालयातील आयोजित बैठकीत हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, उद्योग व व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष सौ. दर्शना बाबर देसाई हे उपस्थित होते.