कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय मुलांसाठी कुडाळच्या ‘संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी’ ने १० मे पासून ते ३० मे २०२२ पर्यंत नृत्य अभिनय शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर माधुर्य खानावळ, जडये कंपाऊंड, कुडाळेश्वर मंदिर रोड, कुडाळ येथे सुरु झाले असून यासाठी प्रवेश शुल्क म्हणून केवळ ५०० रुपये आहे. या शिबिरात भूषण बाक्रे, अदिती दळवी, भावना प्रभू, सानिका कुडतरकर या नृत्यक्षेत्रातील तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. या शिबिरात वय वर्षे ७ च्या पुढील मुलांना सहभाग घेता येईल. मे महिन्याची सुट्टी विद्यार्थी वर्गासाठी केवळ शैक्षणिक न राहता त्यांच्यातील कलागुणांना वाव देणारी ठरावी म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उदघाटन दीपप्रज्वलन आणि नटराज शिव यांना वंदन करून करण्यात आले. कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक अभिषेक गावडे, ऍडव्होकेट रीना पडते, राजा पडते यांची यावेळी मुख्य उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक अभिषेक गावडे म्हणाले की, आजच्या मुलांनी पाठयपुस्तकातील अभ्यास करताना नृत्यक्षेत्रातही मागे राहू नये. आपल्या अंगातील कलागुणांना बाहेर काढणे आवश्यक असून आपण नेहमीच अशा शिबिरांना पाठबळ देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. या नृत्य शिबिरात सिंधुदुर्गातील अनेक विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थिती दर्शविली. काल पहिल्या दिवशी विद्यार्थी वर्गाला नृत्य क्षेत्रातील प्राथमिक संकल्पना तज्ज्ञांनी शिकविल्या. या नृत्य शिबिरात सहभागी होण्यासाठी संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी’ च्या अदिती दळवी (मो. क्र. ९९२३३००३६६) आणि भूषण बाक्रे (मो. क्र. ९९२१६८७४८५) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.