मधुमक्षिका पालन पेट्या लावूनही हत्तीचे आगमन: पैशांचा गैरवापर सिद्ध
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील हत्तीबाधित क्षेत्रात हत्तीप्रतिबंधासाठी अनेक उपाय योजना करण्यात आला, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च केले मात्र याचा काहिही उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले असून मधुमक्षिका पालन पेट्या हत्तीच्या मार्गात लावल्यास हत्ती या मार्गातून येत नाहीत असे लॉजिक वापरून बसवण्यात आलेल्या पेट्या ह्या बिनकामाच्या असल्याचे सिद्ध झाले आहे, वनविभागाने या पेट्या बसवण्यासाठी यावर एका संस्थेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च केले मात्र ते वाया गेल्याने “त्या” पेट्या नेमक्या का बसवण्यात आल्या यामागचा नेमका उद्देश काय? असा सवाल करत याविरोधात चौकशी करण्यासाठी आपण संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे शिवसेना दोडामार्ग तालुका संघटक गोपाळ गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, सध्या मोर्ले केर परिसरात हत्तीचे आगमन झाले आहे, मात्र यांचा मार्ग हा ह्या बसवलेल्या पेट्याच्या बाजूने असल्याने या पेट्यांचे नेमके काम तरी काय असा सवाल गोपाळ गवस यांनी केला आहे. यामागे नेमके कोणते शास्त्रीय कारण आहे याचा शोध घेणे गरजेचे बनले असून यातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता गवस यांनी व्यक्त केली आहे.