अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष मा.श्री. रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी सिंधुदुर्ग मधून सौ.गौरी महेश तेली यांची नवनियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कणकवली शहर तसेच कणकवली तालुका काँग्रेस यांच्याकडून पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.