You are currently viewing आई

आई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. गझल प्रविण्य… गझल मंथन समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे यांची अप्रतिम काव्यरचना*

वनहरिणी : ८/८/८/८

*💐आई💐*

आभाळाची ममता देते, जन्म देवुनी माझी आई
सुंदर जगणे करते माझे, रीत सांगुनी माझी आई

मला आठवे आई संगे . घालवलेल्या साऱ्या गोष्टी
डोळे भरती अश्रू गळती . मज आठवुनी माझी आई

जीवनात ते सौख्य मिळावे . साऱ्या बाळां माऊलीचे
हेच मागणे मागू आता . देवा आळवुनी माझी आई

भाग्यवती मी वाटे मजला . जन्म घेतला तिच्याच पोटी
पुण्याई मज थोर वाटते . अशी लाभुनी माझी आई.

स्वामी सुद्धा तिन्ही जगाचा . शिवाय आई असे भिकारी
माय थोरवी श्रेष्ठ म्हणावी . अशी जाणुनी माझी आई

वात्सल्याचा अन् प्रेमाचा अथांग सागर होती आई
कशी अचानक अवचित गेली मला सोडुनी माझी आई

शोभा वागळे
मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा