You are currently viewing गाबीत समाज बांधवानी ऋणानुबंध अधिक दृढ करावेत – परशुराम उपरकर

गाबीत समाज बांधवानी ऋणानुबंध अधिक दृढ करावेत – परशुराम उपरकर

कणकवली :

वधुवरांचे विवाह योग्य वयात, योग्यवेळी व सुयोग्य कुटुंबियांत जमण्यासाठी गाबीत समाज बांधवानी आपआपसातील ऋणानुबंध अधिक दृढ़ केले पाहिजेत असे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार श्री. परशुराम उपरकर यांनी केले आहे.

 

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील” सुमनराज ट्रेड सेंटर टेरेस हॉल”येथे गाबीत समाज वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर, वेंगुर्ले तालुका माजी अध्यक्ष श्री.वसंत तांडेल, देवगडचे तालुकाध्यक्ष श्री.संजय पराडकर, मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, श्री. लक्ष्मण तारी, श्री. सुनील कोळंबकर हे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार श्री. परशुराम उपरकर म्हणाले कि, हिंदू संस्कृती मध्ये पूर्वीपासुनच शास्त्रोक्त पद्धतीने विवाह करण्याची परंपरा आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे पूर्वी वधुवरांचे विवाह नातेवाईक जमवित होते. परंतु आता स्वतंत्र कुटुंब पद्धतीमुळे वधु वरांची माहिती मिळविताना अनेक अडचणी येत असतात. त्यासाठी वधुवर मेळावे घेणे आवश्यक आहे. म्हणून गाबीत समाजातील लोकानी समाज संघटनेच्या सर्व उपक्रमातून स्वेछेने सहभागी होत राहिल्यास ओळखीतुन विवाहाच्या समस्या मार्गी लागणयासाठी मदत होऊ शकते.

मेळाव्याचे प्रास्ताविक गाबीत समाज जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी केले. यावेळी मान्यवरानी वधुवरांच्या वाढत्या अपेक्षा, सध्याची जीवनपद्धती आणि पालकांच्या व्यथा याबाबत आपले विचार व्यक्त केले. कांही वधुवरानी सुद्धा आपल्याला अपेक्षित भावी वधु अथवा वराबाबत असलेल्या अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या तसेच असे मेळावे वेंगुर्ले, देवगड, मालवणच्या पंचक्रोशीतील गावातून घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार गाबीत समाजाचा पुढील वधुवर मेळावा देवगड येथे ऑक्टोबर 2022 मध्ये घेण्याचा निर्णय जाहिर करणेत आला. तसेच शुक्रवार दिनांक 20 मे 2022 रोजी 11 ते 2.00 यावेळेमध्ये तारकर्ली ग्रामपंचायत हॉल येथे वधुवर नोंदणी फॉर्म भरून घेण्यात येतील, असे जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यानी जाहिर केले आहे. यावेळी श्री.बाळा राणे, नितीन तळेकर, श्री.सावंत, स्वप्नील तारी, सुहास खडपकर यांनी नोंदणी करणेसाठी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा