You are currently viewing देवगड-निपाणी रस्त्याची फोंडातिठा ते लोरे फाटा रस्त्याचे तातडीने नुतणीकरणासाठी निवेदन

देवगड-निपाणी रस्त्याची फोंडातिठा ते लोरे फाटा रस्त्याचे तातडीने नुतणीकरणासाठी निवेदन

पावसाळ्यात अपघात होऊन जीवितहानी झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखलचा इशारा – संजय आग्रे व राजू पटेल

देवगड-निपाणी रस्त्याची फोंडातिठा ते लोरे फाटा रस्त्याचे तातडीने नुतणीकरण करण्यात यावे. नूतनीकरण न केल्यास व पावसाळ्यात येथे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा माजी जिप सदस्य तथा जिल्हा विकास नियोजन मंडळाचे माजी सदस्य संजय आग्रे व राजू पटेल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फोंडातिठा ते लोरे फाटा देवगड-निपाणी रस्ता हा वाहतुकीस अत्यंत खराब झाला असून या ठिकाणी यापूर्वी झालेल्या अपघातात जिवितहानी झालेली आहे.

या रस्त्याची पाहणी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता व शाखा अभियंता उप विभाग कणकवली १ यांचेमार्फत झालेली आहे. तसेच याची माहिती आपल्याला यापूर्वीच वेळोवेळी देण्यात आलेली आहे. करुळ घाट बंद होता, त्यावेळी अवजड वाहने यामार्गे जात होती. परिणामी सदर रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला आहे. तसेच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वरील रस्त्यावर नमुद केलेल्या ठिकाणी वाहनांना अपघात होऊन जीवीतहानी झाल्यास आपल्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल. तरी सदर रस्त्याचे नुतणीकरण तातडीने करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =