You are currently viewing आई कुणा म्हणू मी

आई कुणा म्हणू मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना*

*आई कुणा म्हणू मी*
*(मुक्तछंद)*

आई कुणा म्हणू मी
आभाळाची माया
रणरणत्या उन्हातुनी
वटवृक्षाची छाया

प्रजापति उपजे का
आईवाचूनी तो दक्ष
मायेची असे वानवा
अंतरात बहिः रुक्ष

कोमेजले बालपण
आईवाचूनी उसासे
जगलो वाढलो जरी
जीवनात कसेनुसे

अंतरीची आर्त ओढ
स्पर्शाची आस ही ती
कुशीत शिरण्यासाठी
उसवली अनेक नाती

जन्म मज अपघाती
जन्म जन्मदेचे ऋण
जन्मावाचून शेष ना
बंध नात्याचा मी भ्रूण

का रे अनादि अनंता
केलीस अशी ही माव
आईविनाच ही तू मी
नुरलासे भेदभाव

हेमंत श्रीपाद कुलकर्णी
भ्रमणध्वनी क्रमांक—९७६९९८७४५०
hemukul.hk@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा