वैभववाडी तालुक्यातील कुसुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर भाजपाने एक हाती सत्ता मिळवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पानिपत करत भाजपाने शत प्रतिशत यश मिळविले आहे. १० पैकी १० जागा भाजपाने आपल्याकडे राखल्या आहे. तर दोन जागा भाजपाने यापूर्वीच बिनविरोध राखल्या आहेत.
सोसायटीची निवडणूक शनिवारी पार पडली. दरम्यान दुपारी आमदार नितेश राणे यांनी केंद्राला भेट देत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. भाजपाचे निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे कर्जदार गटातून पुंडलिक सहदेव साळुंखे, समाधान गणपत साळुंखे, रत्रोजी आत्माराम साळुंखे, मानसिंग दत्ताराम शिर्के, शिवाजी वसंत साळुंखे, सिताराम रामचंद्र पाटील, गजानन पुंडलिक साळुंखे, दाजी दत्ताराम पाटील, तर महिला प्रतिनिधी गटातून भक्ती विठोबा गाडे, समिधा समाधान साळुंखे यांचा समावेश आहे. तसेच भाजपाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये गजानन राजाराम नामये, रमण यशवंत यादव यांचा समावेश आहे.
ही निवडणूक भाजपा व शिवसेना पुरस्कृत पॅनेलमध्ये झाली. सेनेने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सेनेचे अनेक पदाधिकारी गावात तळ ठोकून बसले होते. भाजपने ही निवडणूक आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. मतदाना दिवशी आमदार नितेश राणे यांनी केंद्रावर भेट देत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माजी सभापती अरविंद रावराणे, प्राची तावडे, सुनील भोगले, धाकू पाटील व मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. निकाल जाहीर होताच सर्व विजयी उमेदवारांचे आ. नितेश राणे यांनी अभिनंदन केले. वैभववाडी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी प्रचारादरम्यान वारंवार बैठका घेतल्या होत्या. विजयानंतर गावातील भाजपा कार्यकर्ते व विजयी उमेदवार यांचे नासीर काझी, अरविंद रावराणे यांनी अभिनंदन केले.