कणकवली
बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभांमधून मशिदीवरील भोंगे उतरण्याबद्दल जाहीर भूमिका घेतली होती. त्या हिंदुत्वाचा व भोंग्याविषयी सोयीस्कर विसर शिवसेनेला पडला आहे.आता राज ठाकरे यांनी प्रखरपणे भोंगे उतरविण्यासाठी सरकारला इशारा दिला.त्यानुसार अनेक मशिदींवरील भोंगे उतरविण्यात आलेत,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भोंगे मशिदीवरील उतरवले आहेत, अनेक अजाण पहाटे भोग्याशिवाय होत आहेत,अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर संपूर्ण देशात भोग्यविषयी जागरूकता आली.लोकांना बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदुत्वाबद्दल कोणीतरी बोलणारा नेता राज ठाकरे यांच्या रुपाने दिसला आहे.हिंदू धर्मातील लोकांना ही भूमिका आवडलेली आहे,दोन दिवसापूर्वी अलाहाबाद कोर्टाने अजाणला स्पीकर लावणे बंधनकारक नाही.असा निर्णय दिला आहे.त्यामुळे एकाच ठिकाणी ३६५ दिवस स्पीकर लावण्याची गरज नाही.अन्यथा आम्हाला हिंदू मंदिरांमध्ये ३६५ दिवस स्पीकर लावण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार आहे,असे श्री.उपरकर यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभांमध्ये भोंगे उतरवुण्यासाठी मागणी केली.युतीत राहून बाळासाहेब सातत्याने बोलले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्षावर टीका करत ४० वर्षांनी बाळासाहेब ठाकरे यांनी सत्ता मिळवली आहे.शिवसेनेने हिंदुत्ववादी भूमिका सोडली तर मनसे हिंदुत्व घेऊन पुढे जाणार आहे.राज ठाकरे पुढील काळात महागाई व अन्य विषयाबद्दल बोलतील,असेही परशुराम उपरकर म्हणाले .
खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना पक्षात अंतर्गत वादावर लक्ष घालावे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाची भूमिका सोडली आहे ती मान्य करावी. विनाकारण राज ठाकरेंवर टीका करण्यापेक्षा स्वतः काय करतो,हे पहावे.टोल टेंटरसाठी कोणाच्या पायापर्यंत गेलात,कोण पार्टनर आहे,हे माहीत आहे,असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.