You are currently viewing सावंतवाडीत लोकअदालत संपन्न, ८२ प्रकरणांवर निर्णय…

सावंतवाडीत लोकअदालत संपन्न, ८२ प्रकरणांवर निर्णय…

सावंतवाडी

तालुका विधी सेवा समितीच्या मार्फत राष्ट्रीय लोकअदालतीत आज ठेवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी ८२ प्रकरणांचा निर्णय होऊन त्यामध्ये १७ लाख ७१ हजार ६२७ रुपये वसुलीचा निर्णय झाला. विधी सेवा समिती तालुका अध्यक्षा,दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर.आर. बेडगकर यांच्या हस्ते आजच्या लोकअदालतीचा शुभारंभ करण्यात आला.

राज्य विधी सेवा प्राधिकरण व सिंधुदुर्ग विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटनेने आयोजित केलेल्या लोक अदालतीचा शुभारंभ दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर आर बेडगकर यांनी केला. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती डी बी सुतार या उपस्थित होत्या तसेच वकील संघटनेचे अँड पी डी देसाई अँड स्वप्निल कोलगावकर, अँड चव्हाण तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

आजचा लोक अदालतीमध्ये न्यायालयातील पेंडिंग प्रकरणे ५५० ठेवली होती त्यातील ४३ प्रकरणाचा निकाल होऊन १६ लाख ५४ हजार ५८८.६६ रुपये एवढी वसुली चा निर्णय झाला याशिवाय वाद पूर्व ५०६ प्रकरणे ठेवली होती त्यातील ३९ प्रकरणांचा निकाल होऊन एक लाख १७ हजार ३९ एवढ्या रकमेचा वसुलीचा निर्णय झाला.

या पेंडिंग व वाद पूर्व मिळून ८२ प्रकरणांचा निकाल होऊन त्यामध्ये १७ लाख ७१ हजार ६२७ रुपये एवढ्या वसुलीचा आज निर्णय घेण्यात आला.

यावेळी पक्षकार, बँक प्रतिनिधी, न्यायालयात कर्मचाऱ्यांनी आणि वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले असे विधी सेवा समितीच्या वतीने सांगण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा