*उद्या ८ मे रोजी लातूरला पारितोषिक वितरण समारोह*
अमरावती :
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे लक्षात घेऊन अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आय.ए.एस.ने व लातूरच्या संस्कार प्रकाशनाने जूनियर आयएएस स्पर्धा परीक्षा हा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून प्रारंभ केला आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लावली तर ते विद्यार्थी कोणत्याही परीक्षेमध्ये लवकर यशस्वी होऊ शकतात. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येतो.
या उपक्रमाला शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी उचलून धरले असून महाराष्ट्राचे शिक्षण संचालकांनी या प्रकल्पासाठी रितसर पत्र काढून या उपक्रमाची पाठराखण केली आहे. गतवर्षी या उपक्रमांमध्ये यशस्वी झालेल्या व संपूर्ण महाराष्ट्रातून गुणवत्ता यादीत आलेल्या सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक समारंभ उद्या रविवार दि. ८ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता लातूरच्या सुप्रसिद्ध अशा दयानंद महाविद्यालयातील दयानंद सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित केला आहे.
आमदार मा. श्री अभिमन्यू पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला लातूरच्या सुप्रसिद्ध शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेवराव गव्हाणे व लातूरच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सचिव श्री सुधाकर तेलंग हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती या प्रकल्पाचे सदस्य व मिशन आयएएसचे संचालक प्रा.डाँ. नरेशचंद्र काठोळे व संस्कार प्रकाशनाचे संचालक श्री ओमप्रकाश जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे . या उपक्रमाचे वैशिष्ट्य असे की या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याकडून नाममात्र प्रतिदिन एक रुपया एवढे अल्प शुल्क आकारण्यात येते.
या शुल्कामध्ये हा विद्यार्थ्यांना त्या त्या वर्गाची स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य मिळतात. त्यांना वर्षभर नियमितपणे विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येते. तसेच त्यांच्या सराव परीक्षांचे आयोजन केले जाते .त्यांचे पेपर तपासले जातात. त्यांना गुणपत्रिका व प्रमाणपत्र देण्यात येते. वर्षाच्या शेवटी या उपक्रमात सहभागी झालेल्या व संपूर्ण महाराष्ट्रातून गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येते. अशा प्रकारचा उपक्रम भारतात गेल्या १० वर्षापूर्वी प्रथमच प्रारंभ झाला असून या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
महाराष्ट्रबरोबर यावर्षी हा प्रकल्प राजस्थानमध्ये देखील प्रारंभ करण्यात आला आहे. शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मिशन आयएएसच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे. प्रकाशनार्थ. प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन IAS अमरावती 9890967003 याांना संपर्क साधावा.