You are currently viewing कला आंगणचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कला आंगणचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

श्री समिर चांदरकर यांना शरद गरुड स्मृती कला पुरस्कार २०२२ प्रदान

 

कुडाळ :

 

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर जमातीच्या लोककलांचे जतन व प्रसार हे काम करणा-या *विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेचा सोळावा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. ३ मे २०२२* रोजी पिंगुळी येथे साजरा झाला. यावेळी संस्थेच्या नविन उपक्रम अंतर्गत ठाकर समाजाचा सातवा वधु वर सुचक पालक मेळावा आयोजित करणेत आलेला होता.

गेली १६ वर्षाहुन अधिक काळ संस्थेच्या लोककला जतन करण्याच्या अविरत कार्याने तसेच संस्था अध्यक्ष श्री. परशुराम विश्राम ग़ंगावणे यांना भारत सरकारच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्राप्त झाल्याने कोरोना काळानंतर हा सोळावा वर्धापन दिन भरगच्च कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कला आंगण महोत्सव २०२२ शालेय विद्यार्थी यांना कलेची ओळख व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आला. या वेळी चित्रकथी कार्यशाळा, रांगोळी कार्यशाळा, निसर्गचित्र कार्यशाळा, टाकाउ पासुन टीकाउ वस्तु बनविणे कार्यशाळा इ. घेणेत आल्या.

सायंकाळी संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त उदघाटन सोहळा तसेच कोरोना योद्धा पुरस्कार सोहळा आयोजित करणेत आलेला होता. यावेळी प्रमुख उदघाटक श्री. अमोल पाठक तहसिलदार कुडाळ, पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे संस्था अध्यक्ष, श्री,भगवान रणसिंग जिल्हाध्यक्ष ठाकर समाज, श्री. समिर चांदरकर, डॉ. गौरव घुर्ये, श्री. प्रेमानंद देसाई,श्री.भास्कर गंगावणे, डॉ . मिनाक्षी गंगावणे, डॉ.सुशांत रणसिंग, श्री.निलेश ठाकुर, श्री भरत गरुड, श्री कृष्णा मस्के, श्री वैभव ठाकूर, श्री वल्लभ मसके, श्री. सुधीर गंगावणे, श्री. चेतन गंगावणे, इ. मान्यवर उपस्थित होते. या वेळी आरोग्य विभागात काम करणा-यांना कोरोना योद्धा हा सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त व्यक्तिना तसेच इतर पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाचे निवेदन श्री. एकनाथ परशुराम गंगावणे यांनी केले.

यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा शरद गरुड स्मृती कला पुरस्कार २०२२ हा श्री समिर चांदरकर यांना श्री अमोल पाठक तहसिलदार कुडाळ यांच्या हस्ते देण्यात आला. कला, रांगोळी व सॅन्ड आर्टीस्ट या क्षेत्रातील त्यांचे भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

संस्थेचे लोककला जपण्याचे काम हे स्तुत्य असुन याला अधिक चालना मिळाली पाहिजे तसेच ठाकर आदिवासी कला आंगण हे एक पर्यटन स्थळ म्हणुन नावारुपास यावे असे उदगार श्री. अमोल पाठक तहसिलदार कुडाळ यांनी काढले.

श्री. प्रेमानंद देसाई अध्यक्ष जिल्हा सरपंच संघटना यांनी पद्मश्री या पुरस्काराने सिंधुदूर्ग जिल्ह्याची ओळख झाल्याचे सांगुन या आदिवासी लोककलेची ओळख सर्वाना व्हावी यासाठी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

श्री. समिर चांदरकर यांनी कै. शरद गरुड या अष्टपैलु व्यक्तीबाबत दिल्या जाणा-या पुरस्काराबाबत संस्थेचे आभार मानले तसेच संस्थेच्या कला विषयक कामकाजामध्ये आपण सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

श्री. परशुराम गंगावणे यांनी संस्थेचा कार्याची माहिती दिली. तसेच पद्मश्री पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यावर जिल्हा ठाकर समाज सिंधुदूर्ग, पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ पिंगुळी तसेच इतर यांनी काढलेली रॅली बाबत विशेष आभार मानले.

सायंकाळच्या वेळी होम मिनिस्टर स्पर्धा घेणेत आली. रात्री गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळ हळवल यांचा मायाजाल हे दशावतार नाटक झाले. संस्थेचा सोळावा वर्धापन दिन भरगच्च कार्यक्रमांनी उत्साहात पिंगुळी येथे पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा