You are currently viewing जिल्ह्याच्या सीमा खुल्या..जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

जिल्ह्याच्या सीमा खुल्या..जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

जिल्ह्यात येणाऱ्यांचे केवळ थर्मल स्कॅनिंग होणार

सिंधुदुर्गनगरी :

मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिमा खुल्या करण्यात येत आहेत. तथापी जिल्ह्यात येणाऱ्यांचे केवळ थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज येथे दिली.

आज व्हिडोओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत, कोकण विभागीय आयुक्त आण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम सहभागी झाले होते.

            जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, जिल्ह्यात येणाऱ्या सर्व व्यक्तींचे जिल्ह्यांच्या सीमेवर दक्षतेचा उपाय म्हणून थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्याबरोबर प्राथमिक माहिती नोंदवून घेण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =