You are currently viewing डेगवे-आंबेखणवाडीच्या ब्राह्मणीस्थळात धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न..!

डेगवे-आंबेखणवाडीच्या ब्राह्मणीस्थळात धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न..!

किर्तनकार नातु बुवा यांच्या कार्यक्रमाने भाविक मंत्रमुग्ध.

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळात गुरूवार दि.5 मे २०२२ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सकाळी ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता; श्री स्थापेश्वर ,महालक्ष्मी देवतांची डेगवे गावचे माजी सरपंच मंगलदास देसाई यांनी सपत्निक श्री ब्राह्मणीस्थळात पुजा केली व त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम व त्यानंतर सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायणाची महापुजेस प्रारंभ केला .


डेगवे आंबेखणवाडी येथे सार्वजनिक श्री ब्राह्मणीस्थळ आहे.या स्थळात आंबेखणवाडीचे ग्रामस्थ प्रतिवर्षी श्री ब्राह्मणभोजन,श्री सत्यनारायणाची महापुजा,श्रावण महिन्यात सप्त सोमवारचे व्रत करणे,त्यानंतर ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता,श्री स्थापेश्वर महालक्ष्मी देवता तसेच श्री ब्राह्मणीस्थळात अभिषेक करणे .शिवाय इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात.हि पंरपरा फार पुर्वजापासून म्हणजे अंदाजे सव्वाशे वर्षांपासून सुरू आहे
अलीकडेच सदर.परीसराच्या जिर्णोध्दाराचे काम ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागातून पुर्ण केले आहे.त्यामुळे मंगलदास देसाई यांच्या परीवारातर्फे श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन केले होते.


त्या निमित्ताने भाविकांनी तिर्थ प्रसादाचा व दुपारी महाप्रसादाचा,लाभ घेतला .रात्री श्री ब्राह्मणी भजन मंडळ,आंबेखणवाडी यांचा भजनाचा,कार्यक्रम संपन्न झाला. त्या नंतर रात्री पुणे येथील किर्तनकार हरिहर नातु यांचे किर्तन पार पडले.सदर किर्तनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते..मुलांचे विविध कार्यक्रम झाले.विद्युत रोषणाईने ;व रांगोळीने परीसर सुशोभित केला होता.गावातील ग्रामस्थांनी व मान्यवरांनी ,माहेरवाशीणीनी हितचिंतक भाविकांनी दर्शन घेतले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डेगवे,आंबेखणवाडीतील ग्रामस्थ,महिला,लहानमुले यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

उल्हास देसाई

प्रतिक्रिया व्यक्त करा