You are currently viewing ८ मे रोजी गांगो गवळदेव मंदिराचा सहावा वर्धापन दिन

८ मे रोजी गांगो गवळदेव मंदिराचा सहावा वर्धापन दिन

जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांच्या महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन..!

*कणकवली :*

तालुक्यातील हळवल भाकरवाडी येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही श्री देव गांगो गवळदेव मंदिराचा सहावा वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांच्या हाकेला धावणारा आणि संकटी पावणाऱ्या गांगो गवळदेव मंदिराचा ८ मे रोजी सहावा वर्धापन दिन संपन्न होत आहे.

तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसह उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा. असे मंडळाकडून निमंत्रित करण्यात आले आहे.

◾ *८ मे रोजी विविध कार्यक्रम पुढीलप्रमाणे:*

▪️ *सकाळी*

१) ५:०० ते ६:०० काकड आरती

*२) ८:०० वा सत्यनारायण महापूजा*

३)१०:०० वा.आरती व तिर्थप्रासाद

४) ११:०० ते १:०० हरिपाठ कीर्तन

*(बुवा ह.भ.प.रविकांत ठाकूर)*

▪️ *दुपारी*

५) १:०० ते २:०० महाप्रसाद

६) ३:०० ते ८:०० स्थानिकांची सुस्वर भजने

▪️ *रात्रौ*

७) ८:३० वा. महाप्रसाद

८) रात्रौ ९:३० वा. सत्कार समारंभ

९) रात्रौ ठीक ९:३० वा.

*जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस (दांडेली) यांचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग* होणार आहे. सर्व भाविकांनि व नाट्यरसिकांनी उपस्थित राहावे असे मंडळाकडून निमंत्रीत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा