You are currently viewing सुंदर शहरातील रोमियो-ज्युलियट प्रेम जोडप्यामुळे लोकांच्या कामांचा खोळंबा

सुंदर शहरातील रोमियो-ज्युलियट प्रेम जोडप्यामुळे लोकांच्या कामांचा खोळंबा

५०शी उलटली तरी चिकना रोमियो ज्युलियट वर फिदा होऊन प्रेमात मग्न

आपल्या दालनात गुंजन करण्यातच व्यस्त

जिल्ह्यातील एका सुंदर शहराच्या कार्यालयात त्या जोडप्यांचे रोमियो–ज्युलियट प्रकरण हा काही नवा विषय नाहीच…अगदी सर्वत्र त्याचा गाजावाजा आहे. परंतु अलीकडेच सेवकांचा कार्यकाळ संपून सर्व जबाबदारी प्रशासनावर आलेली आहे. त्यामुळे गतिमान प्रशासन आणि प्रशासनाची कामे गतीने होणे आवश्यक आहे. येत्या काहीच दिवसात पावसाळा सुरू होणार त्यामुळे कामांना गती मिळणे आवश्यक आहे. परंतु जबाबदार पदावर असलेली रोमियो आणि ज्युलियट हे मात्र आपल्याच मस्तीत दंग असतात. लोकांना आपल्या कामांची काळजी असते, परंतु कामांकडे दुर्लक्ष करीत आयुष्याची “हाफ सेंच्युरी” झाल्यावरही दोघे आपल्या दालनात गुंजन करण्यात व्यस्त असतात, त्यामुळे त्यांच्याकडे कामासाठी आलेल्या शहरातील नागरिकांचा मात्र खोळंबा होतो. त्यामुळे शहरात लोकांमध्ये या रोमियो–ज्युलियट ची गोष्ट मात्र *जेवणासोबत लोणचे तोंडी लावावे* तशी चघळली जात आहे.
खाली मुंडी असणारी ज्युलियट मात्र “मी नाही त्यातली…..” सारखीच वावरत असते. रोमियो स्वतःच्या घरी बांगडे आणि ज्युलियट ला मात्र हलवा पापलेट नेत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मुले लग्नाची झाली असताना आपला रोमान्स मात्र संपत नाही त्यामुळे शहरवासीय चघळून चघळून चर्चा करत आहेत. शिल्लक *स्टॉक* बाबतही काही पत्ता लागत नाही. स्टॉक कुठे आहे? कोणी गायब केला? याबाबतही योग्य ती चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे रोमियो–ज्युलियटने नको ते उपद्व्याप करण्यापेक्षा कामात सुसूत्रता आणून काम करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा