You are currently viewing आता माझे चित्त

आता माझे चित्त

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक-कवी रामदास अण्णा यांची अप्रतिम अभंग रचना

आता माझे चित्त। नाही जरा स्थिर।
फिरे भिरभिर। कोण जाणे।।

उडुनिया गेला। मनाचा निर्धार।
एकचि आधार। तूच माझा।।

तुझे माझे त्यांचे। दिसते वेगळे।
तरीही सगळे। आहे एक।।

एक दोन तीन। नाही ज्यासी भूक।
होईल का चूक। त्यांच्या हाते।।

चित्त नाही स्थिर। करून विचार।
नावाचा प्रचार। कशासाठी।।

तरीही चित्ताला। आहे तुझी ओढ।
वाटे मज गोड। नाम एक।।

तुझे नाम घेता। पुन्हा होई शांत।
नदी नि प्रशांत। एक जैसे।।

रामदास आण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा