मुंबई विलेपार्लेच्या ‘एक्वा बेनहोलेंट फंड ट्रस्टचे’ शैक्षणिक योगदान.
मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक संचलित जनता विद्या मंदिर त्रिंबक या प्रशालेत मुंबई विलेपार्ले येथील एक्वा बेनहोलेंट फंड या ट्रस्ट मार्फत, शालेय भौतिक आणि शैक्षणिक गरजांच्या पूर्तीसाठी अडीच लाख रुपयांची देणगी देण्यात आली. धनादेश स्वरूपातील ही देणगी वायंगणी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री प्रकाश पेडणेकर यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्य आणि प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी पेडणेकर सरांनी घेतलेल्या अपार मेहनती बद्दल आणि शाळेप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमाबद्दल माननीय अध्यक्ष श्री प्रताप बागवे तसेच संस्था कार्यकारणी सदस्य श्री अशोक बागवे यांनी कृतज्ञतापूर्वक प्रशंसा केली.
ट्रस्टच्या या भरीव सहकार्यामुळे शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मोठा हातभार लागणार आहे. त्याचा लवकरात लवकर विनियोग करून आपणास त्यापैकी काही सुविधांच्या उद्घाटनास आम्ही निश्चितपणे बोलावू असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष श्री प्रताप बागवे यांनी केले. ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनाही या प्रसंगी मनःपूर्वक धन्यवाद दिले. याप्रसंगी श्री पेडणेकर सर यांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानाला उत्तर देताना वायंगणी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री पेडणेकर म्हणाले की, माझे आणि त्रिंबक शाळेचे फार पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत. त्यामुळे आपल्या हातून जेवढे सहकार्य होईल तेवढे आपण केलेले आहे, आणि यापुढेही करत राहू. तसेच संस्थेने देणगी गोळा करण्यासाठी माजी विद्यार्थी भेट, तसेच नवनवीन अभिनव मार्ग यांचा विचार करावा, जेणेकरून ग्रामीण भागातील आर्थिक अडचणीत असलेल्या संस्था निश्चितपणे आर्थिक सक्षम होऊ शकतील. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री प्रवीण घाडीगांवकर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री गायकवाड सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री वारंग सर यांनी के