सावंतवाडी
दिंडोरी प्रणित अखिल भारतीय सावंतवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात २२ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह भक्तिपूर्ण उत्साहात स्वामी सेवेकरांच्या उपस्थित पार पडला आहे. यावेळी या सात दिवसात अखंड नाम जप, अखंड श्री स्वामी समर्थ सारामृत वाचन आणि अखंड वीणा तसेच सगळ्यात दुर्मिळ आणि स्वामीच्या अगदी जवळ घेऊन जाणारी प्रहरे सेवा अशी सेवा स्वामी चरणी रुजू करण्यात आली आहे. तसेच अनेक सेवेकऱ्यानी सामूहिक रित्या श्री गुरुचरित्र पारायण करून सेवा रुजू केली आहे. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम मठात आयोजित करण्यात आले होते. यावेळी २३ एप्रिल ला श्री गणेश याग आणि मनोबोध याग, २४ एप्रिल ला श्री चंडी याग, २५ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ याग , २६ एप्रिल रोजी श्री गिताई याग, २७ एप्रिल रोजी श्री रुंद्र याग आणि मल्हारी याग, २८ एप्रिल रोजी श्री दत्तपूजन आणि बली पूर्णाहुती असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
अखिल भारतीय दिंडोरी प्रणित सेवामार्गातून ८० टक्के समाजकारण तर २० टक्के सेवा अशा प्रकारे सामाजिक सेवा देखील केली जाते. या सेवा मार्गाद्वारे समाजातील विविध समस्याग्रस्त भक्तांना मार्गदर्शन करून सेवेकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातात.