वेंगुर्ले
मनसेच्या आंदोलनाबाबत दक्षता म्हणून वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील मनसे तालुकाध्यक्ष सनी बागकर आणि तालुका सचिव राजाराम उर्फ बाबा चिपकर या दोन पदाधिकाऱ्यांना कलम १४९ अन्वये नोटिसा बजावल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदि वरील भोंगे शासनाने ३ मेपर्यंत उतरवावे अन्यथा ४ मे पासून मशिदीसमोर भोंग्या द्वारे हनुमान चालीसा लावण्यात येईल, असा इशारा दिला होता. या अल्टीमेटम नंतर राज्यात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. पोलीस विभागाने मात्र दक्षता म्हणून कारवाई सुरू केली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील सर्व मशिदिं समोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पोलीस गस्त वाढवली असून तालुक्यात दोन पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावून सामाजिक सलोखा बिघडेल असे कृत्य करू नये अशा सूचना त्यांना दिल्या आहेत.