देवगड
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर याठिकाणी दिनांक ६मे ७ मे आणि ८ मे या तीन दिवसाच्या कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती कुणकेश्वर पर्यटन महोत्सव समिती अध्यक्ष प्रसाद गोडबोले यांनी कुणकेश्वरभ क्तनिवास येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली .
यावेळी श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे,सरपंच गोविंद घाडी सदस्य संजय आचरेकर,रुपेंद्र धुवाळी,पर्यटक समिती सदस्य,मंगेश मेस्त्री,प्रदीप कोकम,देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापक रामदास तेजम,तंटा मुक्ती अध्यक्ष तुकाराम तेली,उपस्थित होते. ग्रामपंचायत कुणकेश्वर श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून २०१९ पेक्षा हा महोत्सव फार वेगळ्या स्वरूपाचा असणार आहे. याचे मुख्य उद्दिष्ट देशाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना श्री देव कुणकेश्वराला ७५०० हजार हापूस आंब्यांची आरास करण्याचा मानस आहे. त्यासाठी तालुक्यातील आंबा व्यापारी यांनी स्वेच्छेने आंबे द्यावेत असे आवाहन कुणकेश्वर पर्यटन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. व्यतिरिक्त तालुक्यातील इतर गावातील विकसित होणारी व दुर्लक्षित राहिली पर्यटन ठिकाणे प्रकर्षीत व्हावीत व त्या ठिकाणी पर्यटक जावेत हा उद्देश समोर ठेवून वेगळे माझे गाव ही ऑनलाईन स्पर्धा राबविण्यात येणार आहे .
भक्तांसाठी श्री देव कुणकेश्वर चरणी नामस्मरण करता यावे यासाठी महोत्सवादरम्यान तीन दिवस सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळात ओम नमः शिवाय चा जप भाविक आपल्या वेळेप्रमाणे येऊन करू शकतात. तसेच सायंकाळी समुद्रकिनारी ७ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे .या पर्यटन महोत्सवात प्रामुख्याने दिनांक ६ मे रोजी सकाळी ९ ते १ या वेळात तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, दुपारी ३ वाजता मोटरसायकल रॅली कुणकेश्वर मिठबाव,दहिबाव ,लिंगडाळ ति ठा तळेबाजार जामसंडे ,देवगड मिठमुंबरी गाव कुणकेश्वर. कुणकेश्वर मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय शोभायात्रा यात मुंबईतील प्रसिद्ध ढोल ताशा, ध्वज पथक पथकाचे वादन ,सायंकाळी ७ वाजता समुद्रावर महाआरतीचे आरती करून मान्यवरांचे स्वागत करून तालुक्यातील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दिनांक ७ मे रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी यूपीएससी ,नौदल, बँक भरती यासारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता तालुकास्तरीय पाककला स्पर्धा गोड पदार्थ रवा तिखट पदार्थ चणाडाळ सायंकाळी ७ वाजता समुद्रावर महाआरती करून समुद्रकिनारी तालुक्यातील १०८ पखवाज वादक यांचा विशेष कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे यात ओम नमः शिवाय चा नाद करण्यात येणार आहे.
त्यानंतर रात्री ९ वाजता झी टीव्ही जल्लोष कलागुणांचा विशेष कार्यक्रम यात १० ते १२ फुटी कोंबडा गजराज पोपट, आंबा अशा पपेट यांचे आकर्षण असणार आहे. तिसरे दिवशी ८ मे रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत तालुक्यातील लोकांना आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता समुद्रवर महाआरती ८ वाजता सेलिब्रिटी नाईट या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. या महोत्सवात देवगड तालुक्यातील सर्व गावातील लोककला व कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे बचत गटांना स्टॉल देखील देण्यात येणार आहे.
या महोत्सवातून कला संस्कृती उद्योग खाद्य या सर्वांची सांगड घालून भक्तिभावाने व जल्लोषात हा महोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे त्यामुळे सहभागी होण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत निवेदन देण्यात आलेली आहे या महोत्सवासाठी निधी विशेष अर्थसहाय्य मिळावे याकरता नामदार पर्यटन मंत्री, माननीय पालकमंत्री, जिल्हाधिकारी पर्यटन संचालनालय, आमदार यांना याचा कालावधी देखील निवेदन देण्यात आली होती. यावेळी या सर्वांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले होते.दरम्यान साय ४ ते ११ वाजेपर्यंत बीच वरील मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.