कणकवली :
कणकवली शहरात अक्षय तृतीयेच्या महूर्तावर लिंगायत समाजाचे आराध्य दैवत श्री .बसवेश्वर महाराज यांची जयंती प्रतिवर्षी प्रमाणे साजरी करण्यात आली. मंगळवारी कांबळे गल्ली येथील नियोजित लिंगायत समाज मंदिर जागेत श्री .बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात व विधिवत धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.जिह्यातील शासकीय कार्यालयात श्री .बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कांबळे गल्ली येथील नियोजित लिंगायत समाज मंदिर येथे सकाळी ११ वा.श्री.गणेश पूजा,श्री .बसवेश्वर प्रतिमेचे पूजन तर १२.०० वा. श्री बसवेश्वर महाराज जन्म सोहळा पार पडला.या जन्म सोहळ्यावेळी लिंगायत समाज बांधव शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कणकवली कांबळे गल्ली येथील नियोजित जागेत भव्य दिव्य मंडप ,विद्युत रोषणाई, करून भक्तिमय वतावरणात तसेच विधिवत धार्मिक कार्यक्रम करून हि जयंती साजरी करण्यात आली.
तर लिंगायत समाजातील महिलांकडून श्री बसवेश्वर यांच्या बाल मूर्तीस पाळण्यात घालून पाळणा म्हणत जन्म सोहळा पार पडला.यानंतर आरती,दर्शन,तसेच प्रसाद वाटप करण्यात आले.दरम्यान नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी भेट देत दर्शन घेतले त्यांचा समाजाच्या वतीने शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला .यावेळी शहरातील लिंगायत समाज बांधव शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.