ग्राहक पंचायत कणकवली शाखेची विस्तारित कार्यकरिणीही जाहीर
कणकवली :
महाराष्ट्र ग्राहक पंचायत शाखा कणकवलीची मासिक सभा 2 मे रोजी कणकवली येथील महाराजा मंगल कार्यालयात तालुकाध्यक्ष नामदेव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सचिव महानंद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी जिल्हा संघटक दादा कुडतरकर, रवींद्र मुसळे, मनोहर पालयेकर, श्रद्धा कदम, पूजा सावंत, श्रद्धा पाटकर, विनायक पाताडे, विठ्ठल गाड, प्रकाश चव्हाण, प्रकाश वाळके, सत्यविजय जाधव, राजेंद्र पेडणेकर, चंद्रकांत चव्हाण आदी उपस्थित होते. 12 अथवा 13 मे रोजी राज्यस्तरीय ग्राहक प्रबोधन शिबिर कणकवलीत संपन्न होणार आहे. महाराष्ट्र ग्राहक पंचायत चे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड, सचिव अरुण वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र ग्राहक पंचायत कोकण विभागाचे एकदिवसीय प्रबोधन शिबीर कणकवली शहरात संपन्न होणार आहे.या शिबिरात ग्राहकांचे हक्क आणि अधिकार याबाबत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रबोधन शिबिराबाबत नियोजन आढावा सभा 2 मे रोजी महाराजा मंगल कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीत ग्राहक पंचायत कणकवली शाखेची विस्तारित कार्यकरिणीही जाहीर करण्यात आली