सरले दिवस
मागे वळून पाहताना…
सरले दिवस आठवले.
तुझ्या स्वप्नात येताना,
तू का माघारी पाठवले?
ते पहाटेचे स्मित हास्य,
गाली खळी पाडूनी गेले.
सांजचे ते चोरून भेटणे,
किती अवघड होते झाले.
हाती धरलेले हात तुझे,
हातांशी, बोलुनी मोकळे झाले,
ते गुज आपुल्या प्रितीचे,
शब्दांविना मनासी कळाले.
का त्या जुन्या आठवांचे,
क्षण डोळे भरूनी न्हाले.
पापण्यांच्या कडांवरूनी,
स्वप्न अश्रूंसवे ओघळले.
जगलेले ते दिस सोबतीने,
क्षणांत वाऱ्यासवे पळाले.
कापणारे ओठ तुझे तेव्हा,
निरोपही घायला विसरले.
मागे वळून पाहताना,
सरले दिवस आठवले….!!
(दीपी)✒
दीपक पटेकर