बांदा
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळाचे मुख्य प्रवेशद्वारास डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा ग्रंथमित्र श्री उल्हास बाबाजी देसाई आणि बंधू परीवारातर्फे रुपये 51,000/-ची भरीव देणगी देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
डेगवे आंबेखणवाडी येथे सार्वजनिक श्री ब्राह्मणीस्थळ आहे.या स्थळात आंबेखणवाडीचे ग्रामस्थ प्रतिवर्षी श्री ब्राह्मणभोजन,श्री सत्यनारायणाची महापुजा,श्रावण महिन्यात सप्त सोमवारचे व्रत करणे,त्यानंतर ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता,श्री स्थापेश्वर महालक्ष्मी देवता तसेच श्री ब्राह्मणीस्थळात अभिषेक करणे .शिवाय इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात.हि पंरपरा फार पुर्वजापासून म्हणजे अंदाजे सव्वाशे वर्षांपासून सुरू आहे
अलीकडेच सदर.परीसराच्या जिर्णोध्दाराचे काम ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागातून त्यांनी हाती घेऊन ते पुर्ण केले आहे. सदर प्रवेशद्वार त्यांनी आपले आजोबा स्व.भानु बाबलो देसाई व आजी स्व.सौ.सुंदराबाई भानु देसाई व वडील स्व.बाबाजी भानु देसाई व् आई स्व.सौ.सावित्रीबाई बाबाजी देसाई.यांच्या स्मरणार्थ बांधून दिले आहे.
तसेच सदर ठिकाणी एक स्टिल कपाट श्री रमेश नवसो देसाई आणि बंधू परीवारातर्फे आपल्या आई-वडीलांच्या म्हणजे सौ.इंद्रावती नवसो देसाई व नवसो गोविंद देसाई यांच्या स्मरणार्थ नुकतेच दिले आहे.त्यामुळे स्थानिक डेगवे-आंबेखणवाडीतील ग्रामस्थांनी देणगीदात्यांचे विशेष जाहीर आभार मानले आहेत.शिवाय सदर ठिकाणी व्यासपीठ व कार्यालय बांधकामास आर्थिक सहकार्य करण्याचे अन्य देणगी दारास आवाहन केले आहे.
उल्हास देसाई,
सरचिटणीस
,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई