You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवलीत शासकीय ध्वजारोहण

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवलीत शासकीय ध्वजारोहण

महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

कणकवली

महाराष्ट्र राज्याचा ६५ व्या वर्धापनदिन महाराष्ट्र दिन म्हणून आज राज्यात सर्वत्र साजरा झाला.कणकवली तहसीलदार येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्र ध्वजाला मानवंदना देण्यात आली.यावेळी कामगार दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिन म्हणून वर्धापन दिन सुद्धा आज साजरा करण्यात आला.
कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर राष्ट्र ध्वज फडकवून आमदार नितेश राणे यांनी मानवंदना दिली यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार ,त्याचप्रमाणे नगराध्यक्ष समीर नलावडे, पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा