*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक-कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम वृत्तबद्ध काव्य रचना*
*मी महाराष्ट्र*
*वृत्त—पादाकुलक(८+८=१६ मात्रा)*
बासष्टातुन त्रेसष्टाते
करे मी आज खरे पदार्पण
स्मरती मजला वीरपुत्र ते
मुक्तीसंगर कर प्राणार्पण
शिवरायांच्या संकल्पनेत
अस्तित्व मला ते जाणवले
पेशवाईत अटकेपारच
नावहि माझे पोहचवीले
पाची शाह्या पोर्तुगीजही
इंग्रज सुद्धा आले गेले
कुणासमोरच झुकलो नाही
शौर्यवान ते कामी आले
संत महंत नि कित्येक पंथ
भाषा विविधा जाती पाती
विचारवंती सुधारवादी
माझ्या देही सुखे नांदती
राजकारणी विळख्यात आज
श्वास कोंडता मी गुदमरतो
गत लौकिकास स्मरता स्मरता
आशाकिरणी पण धडपडतो
नसानसा या धमन्यांमधुनी
भारतमाता विश्वंद्य राष्ट्र
पुन्हा उमेदी सातपुड्यांनी
सह्याद्रीचा *मी* *महाराष्ट्र*
—हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई