You are currently viewing क्रिकेट खेळात करिअरची संधी – नगराध्यक्ष समीर नलावडे

क्रिकेट खेळात करिअरची संधी – नगराध्यक्ष समीर नलावडे

कमळ चषक क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन

कणकवली :

कणकवली शहर भारतीय जनता पार्टीतर्फे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य असून या स्पर्धेतून शहरातील क्रिकेटपट्टू भविष्यात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसतील, असा विश्वास नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला.

कणकवली शहर भाजपतर्फे येथील विद्यामंदिर पंटागणावर कमळ चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे . या स्पर्धेचे उद्घाटन समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे , नगरसेवक संजय कामतेकर , अँड विराज भोसले,रवींद्र उर्फ बाबू गायकवाड ,नगरसेविका मेघा गांगण,प्रतीक्षा सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे,राजश्री धुमाळे,प्राची कर्पे,गितांजली कामत,किशोर राणे,बंडू गांगण महेश सावंत,अभय राणे,राजा पाटकर,जावेद शेख,नवराज झेमने,आदी मान्यवर उपस्थित होते.

नलावडे म्हणाले, क्रिकेट खेळाला सुवर्ण दिवस आले आहेत.या खेळात करिअर करण्याची संधी खेळाडूंना प्राप्त झाली आहे. या संधीचा फायदा खेळाडूंनी उठवावा.तसेच शहरातील क्रिकेटपटूंना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल,आशी ग्वाही त्यांनी दिली . यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा शहर मर्यादित असून पहिला सामना वार्ड क्रमांक १ विरुद्ध वार्ड क्रमांक २ या संघामध्ये झाला.या स्पर्धेकरिता १५ हजार रुपये व बकरा व द्वितीय पारितोषिक १० हजार व कोंबडी यासह वैयक्तिक स्वरूपातील पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या १७ संघांनी सहभाग घेतला असून स्पर्धेचा अंतिम सामना उद्या रविवारी सायंकाळी होणार आहे.या स्पर्धेत पंच म्हणून प्रसाद चव्हाण वश्री. वाळवे यांनी काम पाहिले. समालोचन बाळू वालावकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा