दोडामार्ग
शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही कार्यवाही केली त्यासाठी या अधिकारी वर्गावर कारवाई व्हावी तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी प स सदस्य बाळा नाईक यांनी हे आमरण उपोषण पुकारले या उपोषणाला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा विक्रांतजी पाटील यांनी भेट दिली.
मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्यावर इतर सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. ह्या ठरावावर २८ सप्टेंबर रोजी मतदान झाले यावेळी कंटेंटमेन्ट झोन मधील सदस्य एकनाथ गवस हे सभागृहात हजर राहिले होते. हे सर्व तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांसमोर घडले त्यांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही कार्यवाही केली. त्यासाठी या अधिकारी वर्गावर कारवाई व्हावी तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी प स सदस्य बाळा नाईक यांनी हे आमरण उपोषण पुकारले आहे.याला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा विक्रांतजी पाटील यांनी भेट देत चर्चा केली, संबंधितांवर लवकरच कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.
दोडामार्ग भाजपाने जाहीर पाठींबा दिला असून सत्तेच्या जोरावर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून शिवसेनेने हा अविश्वास ठराव यशस्वी केल्याचा आरोप यावेळी भाजपा सरचिटणीस रंगनाथ गवस यांनी केला आहे तर शासनाचे नियम फक्त सामान्यासाठीच आहेत का? सामान्य माणसांना नाहक त्रास देणाऱ्या शासनाला हा प्रकार दिसत नाही का अशा सर्व गोष्टींचा पाढा भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष चेतन चव्हाण यांनी वाचला.
यावेळी आनंद सावंत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा,जावेद खतीप जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा, आनंद शिरवलकर जिल्हा युवा नेते,राजा सावंत शहराध्यक्ष बांदा, साईनाथ धारगलकर यांच्यासह जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत आठलेकर, संजय मणेरीकर सरचिटणीस रंगनाथ गवस, प्रविण गवस, शक्तिकेंद्रप्रमुख योगेश महाले, कोनाळ सरपंच पराशर सावंत, समीर रेडकर, मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस,सुमित म्हाडगुत, युवा मोर्चाचे अभिमन्यू गवस पिकी कवठणकर, संदीप नाईक राजेश पुलारी,रोहन चव्हाण,प्रवीण गवस यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.