You are currently viewing तलाव ठेक्याने घेणाऱ्या राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा

तलाव ठेक्याने घेणाऱ्या राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा

तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास मे अखेरपर्यंत मुदतवाढ –

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख

गेल्या वर्षीच्या तलाव ठेक्याच्या रक्कम माफीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणणार

सिंधुदुर्गनगरी

कोरोना प्रादुर्भाव काळात आर्थिक झळ सहन कराव्या लागलेल्या राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव, जलाशयांची  वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच 2021-22  तलाव ठेक्याची रक्कम माफ करण्याचा  प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी दिली.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी राज्यात घोषित लॉकडाऊनमुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना पूर्ण क्षमतेनुसार मासेमारी करता आली नाही,  तसेच उत्पादित मासळीची विक्री करण्यास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे मच्छीमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्यातील मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव आणि जलाशयांची चालू वर्ष सन 2021-22 ची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी  31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मंत्री श्री. शेख यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा