महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांनी व्यक्त केला विश्वास
सावंतवाडी
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे जिल्हा दौऱ्यावर असताना सावंतवाडी तालुक्याच्या आरोग्य समस्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी तालुक्यातील आरोग्याचे प्रश्न शासनाच्या माध्यमातून मार्गी लावू असे सांगितले आहे. त्यामुळे तालुक्यात असणारे आरोग्याबाबत प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी नक्कीच लागतील असा विश्वास महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा नेते संदेश पारकर, जिल्हा संघटक जान्हवी सावंत, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती अनुष्का कांबळी, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष आस्मिता राऊळ, सुनिल डूबळे, सचिन वालावलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर आदी उपस्थित होते.