भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली घोषणा
कुडाळ:-
भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वात एका कोटी हुन अधिक नागरिक राज्यात भाजपचे सदस्य झाले आहेत.केंद्रसरकरच्या आत्मनिर्भर योजने अंतर्गत संघटक म्हणून तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्या मानस आणि जबाबदारी अनिल (बंड्या )सावंत यांच्या वर आज येथे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली आहे. सावंत यांचा पक्षातील अनुभव आणि पक्षासाठी चे योगदान यांचा विचार करून संयोजक म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
केंद्रसरकरच्या आत्मनिर्भर योजनेचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहचावा आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षसंघटनेत वाढ होण्याच्या हेतून हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे.