मनसे विद्यार्थी सेनेची पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..
देवगड
देवगड तालुक्यातील मशिदींवरील व प्रार्थनास्थळवरील विनापरवाना भोंग्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी .अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने देवगड पोलीस निरीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
या वेळी मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष राकेश मिराशी,मनसे तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री,देवगड शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष पपु जाधव प्रतीक मुळम,विशाल मिराशी,सुमित तेली,मिनेश कोकरे,आदित्य कदम,उपस्थित होते. या निवेदनात नमूद केलेप्रमाणे मा. उच्च न्यायालयाच्या आदेशा नूसार मशिदी व धार्मिक स्थळावरील भोंग्यांवरती कारवाई होणे अपेक्षित होते.त्या स्वरूपाची कारवाई झालेली नाही.ध्वनी प्रदूषण कायदा सर्वांना लागू आहे.कायद्या पेक्षा धर्म मोठा नाही.कोणत्याही धार्मिक स्थळांना नागरिकांच्या आरोग्याला त्रास देण्याचा अधिकार नाही .असे मा. न्यायालयाने स्पष्ट केले आहे.तरीदेखील देवगड ओ पोलीस हद्दीतील कित्येक मशिदींवरील भोंगे अनधिकृत पणे सुरू आहेत त्यांचेवर ३ मे पर्यंत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असेही नमूद केले आहे.