You are currently viewing इचलकरंजीत रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

इचलकरंजीत रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी नगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचा प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ताप्राप्त तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ घोरपडे नाट्यगृहात माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे ,पालिकेचे उपमुख्याधिकारी केतन गुजर ,नगर अभियंता संजय बागडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाने मान्यवरांकडून
यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांच्या चेह-यावर वेगळाच आनंद ओसंडून वहात होता.

इचलकरंजी नगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जातात.याशिवाय प्रज्ञा शोध परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा , विविध खेळांच्या स्पर्धा व अंगभूत कलागुणांच्या विकासासाठी शिक्षिकांचे सामुहिक प्रयत्न अंत्यत महत्वाचे ठरु लागले आहेत.याचाच परिणाम रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमधून अनेक चांगले विद्यार्थी घडत असून शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिकात मोठी भर पडत चालली आहे.या विद्यानिकेतनचा विद्यानिकेतनचा प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ताप्राप्त तसेच सर्व बक्षिसपात्र विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच घोरपडे नाट्यगृहात माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे ,पालिकेचे उपमुख्याधिकारी केतन गुजर ,नगर अभियंता संजय बागडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी विद्यानिकेतन प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थी,५वी, ८ वी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तसेच एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी, नृत्य, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी यासह अन्य स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि बक्षीस
देवून गौरविण्यात आले.
यावेळी काही हौशी कलाकारांनी विविध गीतांवर उत्कृष्ट
नृत्याची कला सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमासाठी इचलकरंजी नगर अभियंता संजय बागडे, लेखापाल
सुनिल बेलेकर, शिक्षक विभाग लेखापाल विजय कोळी, वरीष्ठ लिपिक बाबाजान जमादार ,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र ठिकणे, प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय कुडाळकर
पत्रकार पंडीत कोंडेकर ,सागर बाणदार , बसवराज कोटगी , साईनाथ जाधव , धर्मराज जाधव , शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार तसेच सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी , रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. रावळ व सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतात
शिक्षकांनी अंत्यत कर्तव्यनिष्ठेने अध्यापनाचे कार्य करत सुसंस्कारित व सक्षम विद्यार्थी घडवण्याचा सुरु ठेवलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगून टागोर विद्यानिकेतनच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा आणि विविध क्षेञात इचलकरंजी शहराचे नांव निश्चित उज्वल करतील ,असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक विद्याधर भट ,
उपमुख्याध्यापिका श्रीमती अलका शेलार – खोचरे , राजेंद्र घोडके ,शिक्षिका माणिक धुपदाळे ,शिक्षक दिनेश पाखरे , संजय आवळे यांच्यासह अन्य शिक्षक – शिक्षिका व व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी
अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी पालक , विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा