You are currently viewing भोंगा भोंगा..

भोंगा भोंगा..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य निवृत्त पोलिस अधिकारी लेखक-कवी वासुदेव खोपडे यांची अप्रतिम काव्यरचना*

 

*भोंगा भोंगा*

 

पुरोगामी बुरख्या आड

नाचविती नाना सोंगा

गुण्यागोविंदे नांदू या

नका खेळू भोंगा भोंगा !!

 

देवदूत अल्ला लल्ला

नाना रूपे नाना रंगा

तया भजावे अंतरी

शांती होऊ नये भंगा !!

 

कुणी वाजवितो घंटा

कुणी करितो रे कल्ला

नाही कानाने बहिरा

माझा देव अल्ला लल्ला !!

 

घंटानाद तो मंदिरी

बांग दयावी रे काब्यात

जागेल काय देव,खुदा

कल्ला करून भोंग्यात !!

 

असावे रे धर्मनिष्ठ

परी धर्माध नसावे

राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम

मना मनात असावे !!

 

माणुसकीच खरा धर्म

नको धर्मा साठी दंगा

थांबवा झेंड्याचा खेळ

नका खेळू भोंगा भोंगा !!

 

 

वासुदेव महादेवराव खोपडे

सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)

अकोला 9923488556,

प्रतिक्रिया व्यक्त करा