You are currently viewing योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत राष्ट्रवादीचा कणकवलीत कँडल मार्च……

योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत राष्ट्रवादीचा कणकवलीत कँडल मार्च……

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कडव्या शब्दात केला योगी सरकारचा निषेध

कणकवली

उत्तर प्रदेश सरकार महिलांच्या भावनांशी खेळत आहे त्यामुळे योगी आदित्यनाथ यांचे सरकार तात्काळ बरखास्त करून याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी तरच हाथरस पीडितेला ज्ञाय मिळेल असे मत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी व्यक्त केले आहे. आज पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत राष्ट्रवादीच्या वतीने पटवर्धन चौक ते आंबेडकर पुतळा असा कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी अत्यंत कडव्या शब्दात पिळणकर यांनी योगी सरकारचा निषेध केला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, डॉ अभिनंदन मालांडकर, सुंदर पारकर, देवेंद्र पिळणकर, प्रकाश सावंत, संतोष तेली, दिगंबर सुतार, गौरेश पारकर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्तर प्रदेश येथील हाथरस मध्ये दलित युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर पीडित युवतीचा मृत्यू झाला, तो मृतदेह नातेवाईकांना न दाखवता पोलिसांनी परस्पर अंत्यविधी केला. उत्तर प्रदेश सरकार महिलांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप करत कणकवलीत राष्ट्रवादीच्या वतीने मेणबत्ती पेटवत निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी योगी सरकार व केंद्र सरकारच्या निषेध करण्यात आला.यावेळी आंबेडकर पुतळ्याजवळ हाथरस येथील पिढीतेला श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना अनंत पिळणकर म्हणाले, योगी सरकारचा निषेध करावा तेवढं कमीच आहे. उत्तरप्रदेश मध्ये एका मुलीवर बलात्कार करण्यात आला. ती मुलगी आपल्यावरील अत्याचाराबाबत बोलू नये यासाठी तिची जीभ छाटण्यात आली. तिला कंबरेतून मोडण्यात आलं. यामुळे योगी सरकारचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. या मुलीच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी यूपीतील योगी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, दोषींवर कडक कारवाई करावी. असे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा