You are currently viewing तेरवण मेढे येथील बीएसएनएल टॉवर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बंद

तेरवण मेढे येथील बीएसएनएल टॉवर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बंद

दोन दिवसांत टॉवर सुरू न झाल्यास सावंतवाडी कार्यालयात घेराव घालू..

सामाजिक कार्यकर्ते प्रविण गवस यांचा निर्वाणीचा इशारा

दोडामार्ग.

तालुक्यातील तेरवण मेढे येथील बीएसएनएल टॉवर गेल्या पाच-सहा दिवसांपासून बंद स्थितीत आहे. बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे ग्राहकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मोठ्या संख्येने ग्राहक असूनही बीएसएनएल मात्र चांगल्या सेवा देण्याबाबत कोणतीही हालचाल करताना दिसत नाही.
संबंधीत अधिकार्‍यांना तेरवण मेढे येथील टॉवर बंद असल्याची कल्पना देवून देखील हे अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे कानाडोळा करत आहेत. तेरवण मेढे येथील बीएसएनएल टॉवर तात्काळ सुरु न केल्यास ग्रामस्थांना सोबत घेवून सावंतवाडी येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा