You are currently viewing ८ मे २०२२ रोजी नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा

८ मे २०२२ रोजी नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा रविवार ८ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. भक्ताच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा म्हणून या देवस्थानची सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचिती आहे. यावेळी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या जत्रेचे विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकमेव मटण भाकरीचा प्रसाद या जत्रेनिमित्ताने वाटप केला जातो.

यानिमित्त सकाळी ८ ते ९ पूजाविधी, सकाळी ९ ते २ नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे, सायं.४ ते ८ महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने जत्रोत्सव साधेपणाने शासनाच्या नियमानुसार करण्यात आला होता. मात्र यावर्षी मात्र श्री कोळंबा जत्रोत्सवाला लाखोच्या संख्येने भाविक हजेरी लावणार असून यासाठी श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगावने जय्यत तयारी सुरू केली आहे. तरी जत्रोत्सवास भाविकांनी उपस्थित राहवे असे आवाहन श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगावचे अध्यक्ष नागेश मोरये यानी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा