युवा कवी प्रविण खोलंबे यांची मराठी काव्यरचना.
शब्द झाले जगण्याचा श्वास
निसर्गाच्या गर्भात दडले,
काव्य धन हे शब्दांचे,
येई दाटुनी कोऱ्या कागदावरी,
भरलेलं मन हया भावनांचे.. ||१||
जन्म घेतला कवितेनं,
आयुष्याच्या सोबतीनं,
ध्यास आहे फक्त तुझा,
सांगितलं शब्दांच्या मैत्रीणीनं ||२||
फुटला शब्दांचा पाझर,
व्यक्त झालो मी लेखनीनं,
पुस्तक वाचनाच्या सोबतीनं,
कोऱ्या कागदाच्या साक्षीनं ||३||
गुज माझे मनातले,
शब्द माझे रानातले,
कोऱ्या कागदावरी दिसले,
भाव माझे लेखनीतले ||४||
धगधगत्या माझ्या आयुष्यात,
लिहिण्याचा लागला ध्यास,
कवितेची लागली आस,
शब्द झाले जगण्याचा श्वास ||५||
कवी प्रविण खोलंबे.
मो.८३२९१६४९६१