You are currently viewing राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतला सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचा आढावा..

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतला सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचा आढावा..

आ.वैभव नाईक , जिल्हाधिकारी, जिल्हाशल्यचिकित्सक यांनी मांडल्या समस्या

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज जिल्ह्यातील आरोग्य विषयक सोयी सुविधा तसेच कोविड १९ संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली.या बैठकीत कोविड रूग्णांवर केले जाणारे औषधोपचार, कोविड केअर सेंटर,कोविड नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजना, औषध साठयाबाबत तसेच जिल्ह्यातील आरोग्याच्या सोयी सुविधांचा आढावा त्यांनी घेतला.आरोग्य विभागातील रिक्त पदांची माहिती त्यांनी घेतली.येत्या मंगळवारी मुंबईत आमदार वैभव नाईक यांच्यासमवेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन सिंधुदुर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत चर्चा करणार असल्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

तसेच शासकीय मेडिकल कॉलेज लवकरात लवकर उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आ.वैभव नाईक यांनी यावेळी केली. तसेच इतर समस्या सोडविण्याबरोबरच, आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरविण्याची मागणी त्यांनी केली.जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर यांनीही आरोग्य विषयक अडचणीबाबत मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.आरोग्य विषयक असलेल्या समस्यांबाबत निवेदन देखील देण्यात आले.
दरम्यान राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे ओरोस येथे शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे,
आमदार वैभव नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, डॉ.वालावलकर,डॉ झाट्ये, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,जि.प गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, अवधूत मालवणकर,वेंगुर्ला सभापती सौ.जाधव, संदेश पटेल, सुनील दुबळे, आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा